भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा
एसटी संपाचा (ST Workers Strike) आज बारावा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 12 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत.
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहे.
एसटी संपाचा (ST Workers Strike) आज बारावा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 12 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे. काल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे.
आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले.
दरम्यान राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थौरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत
एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या 7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 आहे.
बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
दुसरीकडे एसटी कामगारांच्या आत्महत्यांचं सत्र थांबत नाहीय. एसटीचे विलीनीकरण करा या मागणीसाठी खामगाव येथील एसटी डेपोत मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबालकर या कर्मचाऱ्याने काल रात्री विष प्राशन केले होते. त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान विशाल अंबालकर यांचा मृत्यू झाला. राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची भर पडली आहे. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे.
Nana Patole exclusive: मागण्या मान्य करुनही ST कर्मचारी मैदानात!
संबंधित बातम्या :