ST Workers Protest : पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ; संजय राऊतांचं टीकास्त्र
पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर ( ST Workers Protest) केली आहे.
ST Workers Protest "आज आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी चप्पल फेकण्यात आल्या. ही गोष्ट अत्यंत दु्र्देवी आणि चिंता वाटावी अशी आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. न्यायालयानेही आंदोलनाबाबत निर्णय दिला आहे. तरीही एवढे आक्रमक आंदोलन झाले आहे. त्यामुळे पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशिष्ट एका गटाची डोकी भडकावण्याचे काम केले जात आहे, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे नाव न घेता लगावला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत निवास्थानी घूसून चप्पल फेकल्या. या आंदोलनानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ज्यांच्या डोळ्यात खूपत आहे, त्यांनी हा प्रकार केला आहे. शरद पवार हे संसदीय लोकशाही माणणारे नेते आहेत. आंदोलन आणि मोर्चे हे जनतेचा हक्क आहे, या गोष्टी माणणारे नेते आहेत. जनतेचा आवाज समोर येण्यासाठी आंदोनल हा मार्ग असतो. परंतु, आज ज्या प्रकारे आंदोलन झाले ते अतिशय दुर्देवी आणि चिंता वाढवणारं आहे"
"राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेल्या. त्या हात जोडून आंदोलकर्त्यांना विनंती करत होत्या. परंतु, समोर जे वर्तण सुरू होतं आणि भाषा वापरली जात होती, हे लोकशाहीतील कोणत्याही आंदोलनाला शोभणारं नाही. या आंदोलकर्त्यांचे नेते कोण आहेत? त्यांचे संस्कार काय आहेत? हे पाहावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक हितासाठी ही गोष्ट चांगली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकायला तयार आहेत. तरीही असे आक्रमक आंदोलन केले जात आहेत. हे दुर्देवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आज दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाला होता.
महत्वाच्या बातम्या