एक्स्प्लोर

ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक

ST Workers Protest :  शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले.

ST Workers Protest :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

बुधवारी हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले. 

दरम्यान, सरकरवर कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं  असल्याची  प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची याचिका निकाली

एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. आज हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली.  कामगारांनी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं कोर्टानं सांगितलं आहे. कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या :

ST Workers Protest Live : विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी दाखल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Embed widget