एक्स्प्लोर

दहावीच्या परिक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिलाच पेपर सुरू असत्ताना काही वेळातच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जळगाव : इयत्ता दहावीच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटला. जळगाव जिल्हायतील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात हा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे . परीक्षा सुरु होताच काही वेळातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर आल्यानं पेपरफुटीचं हे पहिलं वृत्त हाती आलंय.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिलाच पेपर सुरू असत्ताना काही वेळातच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्हायतील मुक्ताईनगर तालुकायतील कुऱ्हा काकोडा गावात उघडकीस आला आहे. या परिसरात केवळ प्रश्न पत्रिकाच व्हायरल झाली अस नव्हे तर मोठ्या प्रमाणावर मराठीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट देखील पाहायला मिळाला आहे. या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर काय कारवाई करते या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

SSC Exam | जळगावमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला, व्हॉट्स अॅपवर पेपर व्हायरल

परीक्षांमधल्या कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. बीड आणि यवतमाळमध्ये कॉपी देण्यासाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली आहे.  दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी देण्यासाठी शाळांच्या भिंतीवर चढून जीव धोक्यात घालून या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी उसळली. यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॉपी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. तर यवतमाळच्या महागावमधील सेंटरमध्ये कॉपी देणारे जमले होते. शाळेच्या भिंतींवर चढून शाळेच्या खिडकीतून चिठ्ठ्या फेकण्यात येत होत्या. हागावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळतोय. त्यामुळे भरारी पथक नेमूणही दहावीच्या परीक्षेत शिक्षण विभाग मात्र नापास झालं आहे.

दहावीच्या परिक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. या परिक्षेसाठी संपुर्ण राज्यात 4979 परिक्षा केंद्रे आहेत. परिक्षा काळात गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत एकुण 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परिक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्याने परिक्षा कक्षात अर्धा तास आधी उपस्थित असणं आवश्यक असल्याची सूचनाही करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत दहावीची परीक्षा सुरु, महाराष्ट्रातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात आज दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु झाल्या आहेत. तर महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावून परीक्षा घेण्याचे निर्देश असताना सुद्धा याची अंमलबजावणी केली जात नाही मात्र भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात असलेल्या जय संतोषी मा महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आज कॅमेरा च्या निगराणीत परीक्षा घेण्यात येत आहे, तर जांभोरा ग्रामपंचायत व महाविद्यालयाच्या संकल्पनेने या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यात आले असून विद्यार्थी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी व कापीमुक्त व्हावा म्हणून सीसीटीव्ही लावण्यात आली असल्यनाने आज याची चर्चा संपूर्ण जिल्ह्याभर होत आहे, तर राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने याची अमलबजावणी प्रत्येक शाळेनी करावी तरच कॉपीमुक्त संकल्पना पुर्नत्वास येईल .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget