एक्स्प्लोर
Advertisement
बस थांबवली नाही तर फोन कर, गणपतराव देशमुखांचं उत्तर
मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये राहणाऱ्या प्रेरणा विष्णू गवळीने मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहिलं होतं.
सोलापूर : शेकापचे सांगोल्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकीर्दीत 11 वेळा आमदारकी भूषवण्याचा मान मिळवला आहे. मात्र सामान्य नागरिकांची सेवा करण्याचा वसा वयाच्या 91 व्या वर्षीही त्यांनी सोडला नाही. बस थांब्याबत एका विद्यार्थिनीने पत्र लिहिताच देशमुखांनी पाठपुरावा करुन तिची सोय केली.
गावात बसचा थांबा करावा, अशी मागणी एका विद्यार्थिनीने आमदार गणपतराव देशमुखांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा करत देशमुखांनी बस थांबा करुन घेतला आणि संबंधित विद्यार्थिनीला पत्र पाठवलं. इतकंच नाही, तर बस थांबवली नाही तर फोन करुन कळव, असंही तिला सांगितलं.
मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये राहणाऱ्या प्रेरणा विष्णू गवळीने मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहिलं होतं. मोहोळला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये जास्त गर्दी होते. तसंच काही विद्यार्थ्यांना जागाही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होतं, अशा आशयाचे पत्र तिने लिहिलं होतं. याबाबत पाठपुरावा करुन सकाळी सात ते 8.15 वाजताच्या दरम्यान दुसऱ्या बसला थांबा करण्याची विनंती केली होती.
या पत्राची दखल घेत गणपतराव देशमुखांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन केला आणि दुसऱ्या बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पेनूरला पंढरपूर-सोलापूर बस सकाळी आठ वाजता थांबणार आहे, असं आमदारांनी पत्राद्वारे प्रेरणाला कळवलं. विद्यार्थिनीने पत्र पाठवलं तेव्हा आपण अधिवेशनासाठी नागपुरात होतो, दुसरं पत्र मिळाल्यानंतर आगारप्रमुखांशी बोलून निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement