एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूर बाजार समितीत पालकमंत्र्यांची सहकारमंत्र्यांना धोबीपछाड, बार्शीत त्रिशंकू
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने आपल्याच पक्षाच्या सहकारमंत्र्यांना धोबी पछाड दिली आहे. भाजपच्या दोन देशमुखांमधील वादाचा फायदा उठवत काँग्रेसने बाजार समितीची सत्ता राखली आहे.
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने आपल्याच पक्षाच्या सहकारमंत्र्यांना धोबी पछाड दिली आहे. भाजपच्या दोन देशमुखांमधील वादाचा फायदा उठवत काँग्रेसने बाजार समितीची सत्ता राखली आहे.
सोलापूर बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सहकारमंत्र्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.बाजार समितीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशा लावत आणि शेतकऱ्यांना मतदानाचे अधिकार देत सुभाष देशमुख यांनी बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आपली ताकद काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकत विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल झाले. साहजिकच अडचणीत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला नवीन ऊर्जा मिळाली आणि आज मंगळवारी झालेल्या मतमोजणीत 16 जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात पालकमंत्र्यांना यश आलं.
भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन निवडणुकीत उतरलेल्या सहकारमंत्र्यांच्या पॅनलने जोरदार लढत देत 2 जागा पटकावल्या, मात्र अतिशय थोडक्या मतांनी पराभवाला सामोरं जाण्याची नामुष्कीही त्यांना पत्करावी लागली आहे.
पालकमंत्र्यांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचा छुपा पाठिंबा असल्यानेच काँग्रेस राष्ट्रवादीसह असलेल्या सर्वपक्षीय पॅनेलला मोठी रसद मिळणे शक्य झाले. या निवडणुकीत पालकमंत्री विजय देशमुख हे कुंभारी गटातून सर्वात जास्त मते घेत विजयी झाले आहेत. तर सहकार मंत्र्यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार दिलीप माने यांनीदेखील पुन्हा विजय मिळविला आहे.
पालकमंत्र्यांच्या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार होते. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन देशमुख मंत्र्यांच्या लढतीत पुन्हा एकदा पालकमंत्री विजय देशमुख सहकारमंत्र्यांना भारी पडले आहेत .
बार्शी बाजार समिती त्रिशंकू
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने शेतकरी गणातील नऊ जागी विजय मिळवला, तर आमदार दिलीप सोपल यांच्या शेतकऱ्यांची बाजार समिती वाचवा आघाडीच्या सात उमेदवारांचा विजय झाला आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या बार्शी तालुका विकास आघाडीचलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
आमदार दिलीप सोपल यांचे पुतणे माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांचा तब्बल 401 मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांचा शेळगाव (आर) गणात पराभव झाला आहे. राऊत गटाचे वासुदेव गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचा विक्रमी 1131 मतांनी विजय झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement