Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 4 जून 2021 | शुक्रवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.
1. महाराष्ट्रातील अनलॉकवरुन राज्य सरकारमध्येच एकवाक्यता नाही, राज्यातील निर्बंध अद्यापही उठवलेले नाहीत, माहिती व जनसंपर्क विभागाचं स्पष्टीकरण
2. राज्यातील अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, गोंधळवणाऱ्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा यू टर्न
3. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरणाची सुविधा
4. ओबीसी समाजाची स्वतंत्र माहिती गोळा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
5. राज्यातील बारावीच्या परीक्षा अखेर रद्द, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शिक्कामोर्तब, मूल्यांकन कसं होणार याकडेच साऱ्यांचं लक्ष
6. लसीच्या देवाणघेवाणीबाबत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा
7. उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण द्यायचंच नाहीये, शिवसेनेच्या भूमिकेची आपल्याला कल्पना, नारायण राणे यांची बोचरी टीका
8. अवैध उत्खननापासून ब्रह्मगिरी पर्वत वाचवण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती; गड किल्ले, जंगल आणि डोंगररांगांचंही संवर्धन होणार
9. रायगडावर गर्दी करु नका, शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं शिवभक्तांना आवाहन
10. कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा दणका; जप्त कलेल्या 5600 कोटींच्या संपत्तीच्या लिलावाचा मार्ग मोकळा