एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 20 एप्रिल 2019 | शनिवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणारी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञाचा थेट माफी मागण्यास नकार,चौफेर टीकेनंतर सारवासारव,नरेंद्र मोदींकडून मात्र उमेदवारीचं समर्थन
- तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी सुपर सॅटर्डे,महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात,गिरीश बापटांसाठी मुख्यमंत्र्यांची पुण्यात सभा तर शरद पवार बारामतीत
- नोटाबंदी फसली तर भरचौकात फाशी द्या सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी कुठला चौक ते सांगावं,महाडमधील जाहीर सभेत राज ठाकरेंचा सवाल
- भाजपविरोधात सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना विधानसभेच्या 25 जागांचं आमिष,भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचा आरोप
- राज्यात पवार नावाचा ब्रँड,त्यामुळेच मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी,राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचं 'माझा'च्या'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात स्पष्टीकरण
- आता संघाची हाफ चड्डी घालू नका,नातेपुतेमधील सभेत शरद पवारांचा विजयसिंह मोहिते पाटलांवर नाव न घेता निशाणा
- उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं किमान शुद्धीत द्यावीत,साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा टोला
- जेट एअरवेजच्या शंभर पायलट्ससह पाचशे कर्मचाऱ्यांना'स्पाईसजेट'कडून नोकरी,आणखी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचीही तयारी
- उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले,20 हून अधिक प्रवासी जखमी,अनेक गाड्यांचा खोळंबा
- आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुचा कोलकत्यावर 10 धावांनी विजय,अखेरच्या षटकात नाईट रायडर्सचा पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement