एक्स्प्लोर
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, सोलापूर, मनमाडमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सव साजरा
शिवनेरी किल्ल्यापासून ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोकमान्य टिळकांनी तरुणांना एकत्र कऱण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली
मुंबई : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी किल्ल्यापासून ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याला हजेरी लावणार आहे.लोकमान्य टिळकांनी तरुणांना एकत्र कऱण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज पर्यंत राज्य आणि देशभरात शिवजंयती उत्सव साजरा केला जातो.
अमेरिका :
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये गेल्या सात वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. न्यूयॉर्कमधील भारतीय दुतावासात साजरी केली जाते भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी स्थापन केलेल्या 'छत्रपती फाउंडेशन'तर्फे दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येते . या कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त हजेरी लावतात. आज छत्रपती फाऊंडेशनच्या वतीनं कोलोरैडो प्रांतातील डेन्व्हर आणि टेक्सास राज्यातील डलास येथेसुद्धा आज शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.
सोलापूर :
सोलापुरातील शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री 12 वाजता भव्य शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यात हजारो महिला सहभागी झाल्या. तर तिकडे औरंगाबादच्या क्रांती चौकातही पोवाडा आणि शिवगीतांच्या वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. शिवाय इथे शिवनेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत.
मनमाड :
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये उत्साह पाहायला मिळाला. सकल मराठा समाजातर्फे संध्याकाळी शहरातून भव्य मशाल यात्रा काढण्यात आली. यांत लहान मुलं, महिला, पुरुषांसोबत शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रात्री उशिरा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवप्रेमींनी पुतळ्यास पुष्हार घालून जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली,
कोल्हापूर :
शिवजयंतीनिमित्त कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये 400 विद्यार्थी 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालणार आहेत. त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
जळगाव :
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी महिलांच्या मोटार सायकल रॅलीचं आयोजन करण्यात येतं. सालाबादप्रमाणे यंदाही काल जळगावमध्ये महिलांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं..यामध्ये महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती सुचेता हाडा यांच्यासह महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला..
हिंगोली :
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत शिवाजी चौक परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सर्व परिसर हा उजळून निघाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement