रामदास कदम भंपक, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही; भास्कर जाधवांचा इशारा
Ratnagiri News Update : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथेआज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Ratnagiri News Update : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या सभेआधी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना दिला.
"देशाची घटाना संपवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो माणूस आयुष्यभर कुणाखाली वाकला आणि झुकला नाही त्यांनी आपल्यासमोर साक्षात इथे दंडावत घातला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रत्नागिरीसाठी काय-काय केलं याची यादीच भास्कर जाधव यांनी वाचून दाखवली. "तळये येथील धरण फुटलं त्यावेळी उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले होते. चिपळूनला महापूर आला त्यावेळी कोरोनाचं संकट असताना देखील उद्धव ठाकरे मदतीसाठी धावून आले. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तक्ते वादळ असो प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे रत्नागिरीकरांसाठी धावून आले. पुरापासून कोकण वाचावा म्हणून दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली. त्यातील एकट्या चिपळूनसाठी 3200 कोटी दिले. कोरोनाच्या संकटात 58 कोटी आणि 67 लाख रूपयांची जिल्हापरिषदेची इमारत दिली. कोकोकणात रस्त्याचं जाळं दिलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाठी रत्ना-सिंधू योजना आणली असे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले, "मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे तीन वेळा रत्नागिरीत आले. परंतु, त्यांनी रत्नागिरीकरांसाठी काय दिलं. मुख्यमंत्र्यांनी साडेआठशे कोटी रूपयांच्या कामांचं उद्घाटन केलं. परंतु, त्याला आधी मंजुरी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिली आहे. विनायक राऊत यांचा खासदार निधीचा पाच कोटी रूपयांचा फंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोठवला. आमचा आमदार फंड दोन कोटी होता, तो अजित पवार यांनी पाच कोटी केला."
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिलं, रत्नागिरी जिल्ह्याला जिल्हा महिला आरोग्य केंद्र दिलं. परंतु, यांनी कोकणासाठी काय दिलं? उलट आमच्या बजेटच्या पैशांना स्टे दिला, समाजकल्यानच्या पैशाला स्टे दिला. कोरोनासारख्या संकटाच्या काळात रामदास कदम मतदारसंघात फिरले नाहीत. त्यांनी मतदारसंघासाठी काय काम केलं हे सांगावं? असं आवाहन भास्कर जाधव यांनी दिले.