एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच, काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य नाही : संजय राऊत  

ममता बॅनर्जी यांनी नुकतीत मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. बॅनर्जी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले.

मुंबई : देशात काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली युपीए आहेच कोठे? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबईत (mumbai) येऊन उपस्थित केला. बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी "काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही," असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (prashant kishor ) करतात. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाना साधला. शिवाय काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही बॅनर्जी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्यावर निशाना साधला आहे. याबरोबरच आज शिवसेनेचे (shiv sena)खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी या प्रकरणावरून माध्यमांसोबत संवाद साधत "तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच होणार आहे. काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य असल्याचे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी नुकतीत मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. बॅनर्जी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले. यातच त्यांनी "देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आहेच कोठे?" असा प्रश्न उपस्थित करत वाद ओढावून घेतला. बॅनर्जी यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांनी तर प्रत्यूतर दिलेच परंतु, सध्या महाष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनातून बॅनर्जी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर निशाना शाधला आहे. त्यानंतर त्यांनी आज सकाळी माध्यमांसोबत या प्रकरणावर संवाद साधला. 

"ममता बॅनर्जी या देशाच्या मोठ्या नेत्या आहेत. भाजप विरोधात सुरू असल्या लढाईत त्या महत्त्वपूर्ण यौद्धा आहेत. युपीए कुठे आहे? हे ममता बॅनर्जींचे विधान तसं पाहिलं तर योग्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितले आहे की, यूपीएला मजबूत करावे लागेल, यूपीएने आणखी आक्रमक झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी तर हे सुद्धा सांगितले आहे की, ज्याप्रकारे युपीए नाही तर दुसरीकडे एनडीए पण नाहीये." असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

जेवढ्या आघाड्या जास्त तेवढा भाजपला फायदा
"देशात जेवढ्या जास्त आघाड्या होतील त्याचा फायदा भाजपलाच जास्त होणार आहे. त्यामुळे जास्त आघाड्या होणे योग्य नाही तसेच काँग्रेसला सोडून इतर कोणता पक्ष आघाडी करू पाहात असेल तर सध्याच्या राजनीतीसाठी हा विचार योग्य नाही. काँग्रेसला सोबत घेऊन आपण काम केले तर त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे आम्ही आधीच सांगितले आहे की, अनेक पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या युपीएलाच आणखी मजबूत बनवले पाहिजे. काँग्रेससोबत अनेकांचे मतभेद असू शकतात. महाराष्ट्रातसुद्धा आमचे मतभेद आहेतच परंतु, आम्ही एकमेकांना साथ देऊन सत्ता चालवत आहोत." असे संजय राऊत यांनी सांगितले.  

शरद पवार यांनीसुद्धा याआधी सांगितले होते
संजय राऊत म्हणाले, "युपीए कुठे आहे? अशी सध्या सर्चा सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात जे यूपीए आहे ते सुद्धा एक यूपीएचे प्रतीकच आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबाबत असे विधान केले असले तरी आता याबाबत सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करावी लागणार आहे. ममता बॅनर्जी यांनी जो विचार ठेवला आहे त्याबाबत त्यांचा आम्ही आदर करतो. याआधीही शरद पवार यांनी सांगितले आहे की, 'आपण एक पर्याय तयार करू. त्यावर विचार करू आणि मग नेता कोण असणार हे ठरवले जाईल." 

 "मुंबईमध्ये आमची ममता बॅनर्जींसोबत चर्चा झाली तेव्हा सुद्धा आपण सर्वांना सोबत घेऊनच पुढे गेले पाहिजे यावर चर्चा झाली होती. काँग्रेसला सोडून इतर कोणती आघाडी बनवली तर मतांची विभागणी होईल आणि याचा फायदा भाजपला होईल. 
 सध्या कोणाचेच सदस्य नसलेल्या अकाली दल आणि इतर काही पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. सोनिया गांधी, शरद पवार, प्रियांका गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते हे काम करू शकतात."असे मतही खासदार राऊत यांनी मांडले. 

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आम्हीच बोललं पाहिजे. कारण त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विचार पुढे नेले. या गोष्टीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाईज केलं नाही. सावरकर हे आमचे आदर्श आहेत आणि आम्ही या आधी सुद्धा अनेकदा म्हटले, सावरकर हे भारतरत्न आहेत सरकारशी काय समस्या आहे की त्यांना भारतरत्नाने सन्मानित केले जात नाहीये. असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.  

Shiv Sena on Mamata Banerjee :ममता यांचं राजकारण सध्याच्या 'फॅसिस्ट' राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखं , पाहा व्हिडिओ

संबंधित बातम्या

शिवसेनेचा 'सामना'तून ममता दीदींवर निशाणा, यूपीएचं कौतुक तर काँग्रेसला सल्ला

Mamata Banerjee Meets Gautam Adani : ममता बॅनर्जीं आणि गौतम अदानींची भेट; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणीEknath Shinde Health : एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाही; उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Embed widget