एक्स्प्लोर
भुजबळ कर्जबुडव्यांच्या यादीत, 'एसबीआय'कडून जप्तीच्या हालचाली
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीनं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयचं तब्बल 6 कोटींचं कर्ज बुडवल्यामुळं बँकेनं कंपनीच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी एसबीआय बँकेकडून वृत्तपत्रात नोटीसही प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. नाशकातल्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जमिनी आणि मुंबईतल्या विविध भूखंडावर बँकेनं प्रतिकात्मक स्वरूपाची जप्ती आणली आहे.
30 दिवसात कर्जाच्या रकमेची फेड न केल्यास, या संपत्तीचा बँकेकडून लिलाव करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळांमागील शुक्लकाष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. पिंपळगाव टोल नाका आणि अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयांवर काल ईडी आणि आयकर विभागाच्या संयुक्त पथकांनी धाडी टाकल्या. मात्र ही इन्कम टॅक्स विभागाची तपास मोहीम आहे. आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत, असं अशोका बिल्डकॉनं सांगितलं आहे.
टोल कंत्राटाच्या बदल्यात अशोका बिल्डकॉन कंपनीकडून छगन भुजबळ यांना मोठा पैसा मिळाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement