एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्यात विसर्जन मिरवणुकांतून डीजे गायब, राजेही गायब
गणेशोत्सवाआधी राणा भीमदेव थाटामध्ये राजेंनी एल्गार केला... 'काय वाट्टेत हे होऊ दे... डीजे वाजणारच...' पण प्रत्यक्षात काल साताऱ्यामध्ये एकाही मंडळात डीजे वाजलाच नाही.
सातारा : 'डीजे वाजवणारच... कोर्टाचा अवमान झाला तर मी बघून घेईन...' असं म्हणणारे खासदार उदयनराजे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कुठे दिसलेच नाहीत. विसर्जनापूर्वी न्यूज चॅनेलच्या हेडलाईन्समध्ये राहणारे राजे मिरवणुकीतून गायब झाले होते. त्यामुळे नेमकं काय झालं, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
साताऱ्यातून डीजे आणि राजे असे दोघंही गायब झाले. गणेशोत्सवाआधी राणा भीमदेव थाटामध्ये राजेंनी एल्गार केला... 'काय वाट्टेत हे होऊ दे... डीजे वाजणारच...' पण प्रत्यक्षात काल साताऱ्यामध्ये एकाही मंडळात डीजे वाजलाच नाही.
सातारा शहरात 238 नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत, तर सातारा जिल्ह्यात 5 हजार 70 मंडळं आहेत. पण एकाही मंडळात डीजे वाजणं सोडाच, साधा दिसलाही नाही. सर्व गणेशभक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला.
उदयन राजे म्हणाले होते, 'डीजेवर पोलिसांनी बंदी घातली... तर मी रस्त्यावर उतरेन...' पण जाहीर सभेतून पोलिसांना आव्हान देणारे राजे काल तरी कुठेच दिसले नाहीत. बरं, बंदी शिथील करण्याची मागणी करणारे दुसरे राजे तर चक्क ढोल-ताशावर नाचत होते.
कायद्याचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मर्जीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कायद्याविरुद्ध भाषा केली, तर असंच होणार... मग ते राजे असोत... की कुणीही...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भंडारा
पुणे
Advertisement