एक्स्प्लोर
सांगलीत हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या
अक्षता कोष्टीने महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेलमध्ये आज सकाळी तिच्या रुममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगली : सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असं या तरुणीचं नाव असून ती वालचंद कॉलेजमध्ये बीई सिव्हिलचं शिक्षण घेत होती. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
अक्षता कोष्टीने महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेलमध्ये आज सकाळी तिच्या रुममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षता ही मूळची जत तालुक्यातील डफळापूरची रहिवासी असून सध्या वालचंद कॉलेजमध्ये सिव्हिल प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती.
अक्षता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रुममध्ये पाच मैत्रिणीसोबत राहत होती. आज सकाळी इतर मैत्रिणी कॉलेजला गेल्या. यानंतर त्यापैकी काही मैत्रिणी पुन्हा रुमवर परतल्या, त्यावेळी अक्षता पंख्याला लटकलेली आढळली. यानंतर हॉस्टेलमध्ये खळबळ उडाली. कॉलेज प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना माहिती देताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
