एक्स्प्लोर
Advertisement
जिवंत रुग्णालाच मृत ठरवलं, मृतदेह घरी नेल्यावर प्रकार उघडकीस
मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत असलेल्या रुग्णाचं नाव दिल्याने हा प्रकार घडला. या भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
सांगली : जिवंत रुग्णालाच मयत ठरवण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडला आहे. मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत असलेल्या रुग्णाचं नाव दिल्याने हा प्रकार घडला. या भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
अविनाश दादासो बागवडे यांना आठ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केलं होतं. सध्या बागवडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून देण्यात आलेल्या बॉडीवर अविनाश बागवडे या जिवंत रुग्णाचं नाव असल्याने नातेवाईकांनीही ती बॉडी ताब्यात घेतली.
अविनाश बागवडे नावाने दुसरीच बॉडी नातेवाईकांना देण्यात आली. आपला रुग्ण मेला आहे या दुःखात नातेवाईकांनी आपल्या मयत ठरवलेल्या बागवडे या रुग्णाची बॉडी तासगाव येथील घरी नेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
आपल्या माणसाची ही बॉडी नसल्याचं निदर्शनास येताच घरी नेलेली बॉडी पुन्हा रुग्णालयात आणली. रुग्णालयाच्या या कारभाराबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. तसेच आपल्या रुग्णाची खात्री केली असता ताब्यात दिलेल्या बॉडीच्या नावाचा रुग्ण जिवंत असल्याची खात्री होताच नातेवाईक आणि अन्य मित्रांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
दरम्यान, या नातेवाईकांना दिलेली बॉडी नेमकी कोणाची याबाबत आता शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाबरोबर पोलीस यंत्रणेच्या कारभाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या संपूर्ण घटनेची 48 तासात चौकशी करुन कामात हलगर्जी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement