एक्स्प्लोर
नगरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न

अहमदनगर : वाळू तस्करांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाल्याची घटना अहमदनगर घडली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांच्या गस्तीदरम्यान काही वाळू माफिया अवैध वाळू वाहतूक करताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, माफियांनी थेट ट्रॅक्टरच त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यानंतर पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलिस नाईक अनिल जाधव जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















