एक्स्प्लोर
Advertisement
खासदार संभाजीराजेंची नदीत उडी, तरुणांसोबत पोहण्याचा मोह अनावर
सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनीसुद्धा भरपूर आनंद झाला.
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यासाठी खासदार संभाजीराजे दोन दिवसाच्या चंदगड तालुक्यात दौऱ्यावर होते. प्रचारादरम्यान धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली आणि संभाजी राजेंना नदीत पोहण्याचा मोह अवरता आला नाही. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार संभाजीराजे चंदगड दौऱ्यावर होते.
खासदार संभाजी राजेंनी गाडी थांबवत कसलाही विचार न करता पाण्यात सूर मारला. सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनीसुद्धा भरपूर आनंद झाला. राजेंसोबत मौजमजा करीत पोहण्याचा आनंद मुलांनी लुटला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून त्यांना विरंगुळा मिळाला.
VIDEO | प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये गेलेल्या खासदार संभाजी राजेंनी घेतला पोहोण्याचा आनंद | एबीपी माझा
खासदार संभाजी राजे आज आपले राजेपण विसरुन जनतेत एकरुप होऊन गेले. मुलांनी हीच संधी साधून संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेतले.
कसा आहे चंदगड तालुका?
हिरव्याकंच निसर्गाचे देणं लाभलेला तालुका म्हणजे चंदगड. कोल्हापूरचे दक्षिण टोक एकीकडे, दुसरीकडे बेळगाव. इथल्या निसर्गात काजू,फणस आंबे विपुल प्रमाणात आढळतात. चंदगडी भाषा मराठीच्या गोडाव्यात भर घालणारी. अजूनही अस्सल ग्रामीण बाज पूर्ववत असा हा तालुका.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement