...जेव्हा सदानंद सुळेंनी सुप्रिया सुळेंना उचलून जेजुरी गडाची पायरी चढली
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या लग्नाला यंदा 28 वर्षे पूर्ण होत आहेत. गडावर नवविवाहीत जोडपी दर्शनाला आल्यावर पती आपल्या पत्नीला उचलून घेत गडाच्या पायऱ्या चढतो. त्यामुळे सुळे दाम्पत्यानं नवविवाहीत जोडप्या प्रमाणे केलेली कृती केलेली पाहून उपस्थितही चकीत झाले.
जेजुरी : महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जेजुरी गडावरील शिवलिंगाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी गडावर जाता सदानंद सुळे यांनी पत्नी सुप्रिया सुळे यांना उचलून घेतलं आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या लग्नाला यंदा 28 वर्षे पूर्ण होत आहेत. गडावर नवविवाहीत जोडपी दर्शनाला आल्यावर पती आपल्या पत्नीला उचलून घेत गडाच्या पायऱ्या चढतो. त्यामुळे सुळे दाम्पत्यानं नवविवाहीत जोडप्या प्रमाणे केलेली कृती केलेली पाहून उपस्थितही चकीत झाले.
महाशिवरात्रीनिमित्त गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनीही दर्शन घेतलं. यावेळी उपस्थित भविकांबरोबर सुप्रिया सुळेंनी सेल्फीही घेतले. महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला येत असतात.
व्हिडीओ -