एक्स्प्लोर
राज्य सरकारकडून सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा
महाराष्ट्रात 97 व्हीआयपींना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत काही बदल केले आहेत. ठाकरे सरकारने सचिनच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्याची एक्स कॅटेगरीच्या सुरक्षेत कपात करत आता एक्सॉट केली आहे. म्हणजेच, त्यामुळे सचिनसोबत यापुढे 24 तास पोलीस कर्मचारी राहणार नसून एस्कॉर्ट सर्व्हीस पुरविण्यात येणार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना 'Y+' सुरक्षा होती. त्यामध्ये बदल करत त्यांना 'Z' कॅटरगीची सुरक्षा दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 97 व्हीआयपींना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
एक्स श्रेणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये दोन सुरक्षा रक्षक असतात. हे दोन्ही सुरक्षा रक्षक हे राज्य पोलिस दलातील असतात. एक्स श्रेणीतील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एक पीएसओ ( पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर) देण्यात येतो. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काल मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीच मागचं कारण सुरक्षाव्यवस्थेत करण्यात आलेल्या कपातीचं असल्याची माहिती मिळत आहे. सचिनने त्याला एक्स श्रेणीत ठेवावं अशी विनंती या भेटीदरम्यान केल्याची माहिती समोर आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सचिन हा केवळ भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सचिनच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : सुरक्षा वाढवण्याबाबत सचिन तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरला आता 'एक्स' कॅटेगरी सुरक्षा नाही.
आता फक्त एस्कॉर्ट सुरक्षा असणार आहे.
आता टोविस तास पोलीस अधिकारी नसणार
आदित्य ठाकरे
आदित्या ठाकरेंना मिळणार त्यांना 'Z' श्रेणीची सुरक्षा
आधी 'Y+' श्रेणीची सुरक्षा होती.
शिवसेनेचे आमदारही आहेत आदित्य ठाकरे
आणखी कोणाच्या सुरक्षेत कपात?
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना आधी Z+ सुरक्षा होती, परंतु, आता त्यांना X श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे.
भाजपचे वरिष्ट नेते एकनाथ खडसे यांना Y श्रेणीची सुरक्षा होती, ती हटवण्यात आली आहे.
वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना आधी Z श्रेणीची सुरक्षा होती, परंतु आता त्यांना एस्कॉटसोबतच Y श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे.
वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम को पहले Z सुरक्षा दी गई थी, लेकिन अब उन्हें एस्कॉट के साथ Y श्रेणी की सुरक्षा मिलेगी.
समाजसेवी अण्णा हजारे यांना आधी Y श्रेणीची सुरक्षा होती. परंतु, आता त्यांना Z श्रेणी सुरक्षा देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर 'मातोश्री'वर
सुरक्षा कपातीच्या कारणावरून सचिनने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement