एक्स्प्लोर

मूळचा सांगलीचा, घरफोड्या नाशिकमध्ये, अन् नेपाळमध्ये रिसॉर्ट

नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे.

नाशिक : नाशिकमध्ये घरफोड्या करुन नेपाळमध्ये स्थायिक झालेल्या गणेश भंडारे या एका श्रीमंत चोराच्या मुसक्या आवळण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मूळचा सांगलीचा असलेल्या गणेशने नेपाळमधील एका महिलेशी लग्न केले असून, चोरी करण्यासाठी गणेश महाराष्ट्रात येतो आणि चोरीच्या पैशातून तो रिसॉर्ट उभारत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. 30 ऑक्टोबर 2016 रोजी नाशिकच्या टागोरनगरमध्ये घरफोडी करुन गणेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो नेपाळमध्ये लपून बसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राज्य गुन्हे अन्वेषन विभाग पुणे यांच्यामार्फत गणेशला प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरलपोलकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता. गणेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, 3 घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेला आणि मुंबईमधील एका सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करणाऱ्या दीपक पोखरकर या व्यावसायिकाला विक्री केलेला 13 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये 547 ग्रॅम सोन्याचा समावेश असून दीपकला देखील अटक करण्यात आली आहे. गणेश भंडारेच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत असून, त्याने अशाच प्रकारे चोरीच्या पैशातून कुठे कुठे आणि किती संपत्ती गोळा केली आहे, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray :मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी,शिवसैनिकांनी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभं राहावं : उद्धव ठाकरे
मराठा बांधवांचा न्याय्य मागण्यासाठी संघर्ष, सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं : उद्धव ठाकरे
Rohit Sharma : रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray :मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी,शिवसैनिकांनी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभं राहावं : उद्धव ठाकरे
मराठा बांधवांचा न्याय्य मागण्यासाठी संघर्ष, सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं : उद्धव ठाकरे
Rohit Sharma : रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
PM Modi in China: ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी पीएम मोदी चीन दौऱ्यावर; शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार
ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी पीएम मोदी चीन दौऱ्यावर; शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
Shambhuraj Desai : आम्हाला दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये  द्यायचं नाही, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य
शिंदे समितीला वेळ का लागला, शंभूराज देसाई यांनी थेट कारण सांगितलं, गॅझेटियर संदर्भातील अडचण मांडली
Manoj Jarange Patil: आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार
आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार
Embed widget