एक्स्प्लोर
पंढरपुरात ‘रिंगण’ विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
पंढरपूर : संतपरंपरेचा मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’ या विशेषांकाचं प्रकाशन पंढरपुरात झालं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाडही उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील संतांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे विशेषांक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या संपादक जोडीने प्रकाशित केले आहेत. संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्यावरील अंक आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. दरवर्षी एका संतावर एक विशेषांक प्रकाशित केला जातो.
भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवणाऱ्या संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर यांच्यावर आधारित यंदाचा ‘रिंगण’चा अंक आहे. वारकरी, नाथ आणि लिंगायत चळवळींचा समन्वय घडवणाऱ्या संत विसोबा खेचरांच्या कर्तृत्त्वाचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.
नव्या पिढीपर्यंत संतविचार पोहोचवण्याची धडपड ‘रिंगण’च्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे जुन्या पिढीसोबतच तरुणांकडूनही या अंकाला भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement