एक्स्प्लोर
Advertisement
अकलुजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण
सराटी येथील नीरा नदीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. नीरा नदी यावर्षी कोरडीठाक पडल्यामुळे तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यासाठी टँकरने पाणी मागवावे लागले.
सोलापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज (रविवार) सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या सराटी येथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी होती. सकाळी प्रस्थानानंतर सराटी येथील नीरा नदीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. नीरा नदी यावर्षी कोरडीठाक पडल्यामुळे तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यासाठी टँकरने पाणी मागवावे लागले.
परंपरेप्रमाणे या टँकरमध्ये नीरा नदीतील पाणी आणून नीरास्नान पार पडले. गेल्या 10 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा भर पावसाळ्यात नीरा नदीला पाणी नाही. त्यामुळे महाराजांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने नीरा स्नान घालण्याची नामुष्की ओढवली आहे.
रिंगणाची मनमोहक दृष्य पाहा
रविवारी सकाळी दहा वाजता पालखी सोहळ्याने अकलूज शहरामध्ये प्रवेश केला. अकलूजमधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. याच प्रांगणामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडले.
आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बाहेरुन येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढली होती.
तुकोबांच्या पालखीला टॅंकरच्या पाण्याने स्नान, नीरा नदी कोरडी पडल्याने प्रशासनाचा निर्णय | ABP Majha
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion