आधी लग्न करून बघा, मग संसार काय असतो ते कळेल; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला
Ramdas Kadam on Shiv Sena : टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल. त्यावेळी खोके काय ते कळेल, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय.
दापोली : "शिवसेना (shiv sena) कोकणी माणसाने मोठी केली. आजची सभा बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) बघत असतील आणि म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिधडलाय, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. त्यांनी यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. "टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल. त्यावेळी खोके काय ते कळेल, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय.
रामदास कदम आज दापोलीत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. "राष्ट्रवादीसोबत संसार मांडू नका, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जावू नका असे बोललो होतो. त्यावेळी मातोश्रीवरून निघून आलो, त्यामुळे भविष्यात मातोश्रीची पायरी कधी चढणार नाही. एक दिवस आधी बैठक झाली, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं होतं, असे रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम म्हणाले, "दापोलीतील शिवाजी महाराज यांचा पुतळा योगेशने बसवला. एकावेळी 90 विकास कामे नगरपरिषदेत सुरु केली होती. विकासाला किंमत नाही का? अजित पवार यांनी पाठवलेल्या खोक्याला किंमत नाही का? आदित्य खोके खोके, गद्दार म्हणत आहेत, परंतु, आदित्य गद्दार तुम्हीच आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता.
पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी मला दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी आदित्य आपण केला आपण केला असं सांगत होते. दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं गद्दारी याला म्हणता. मला आश्चर्य वाटतं की रश्मी ठाकरे कशा नाहीत, उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असता. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत.
"उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही. 50 आमदार कसे जातात, उद्धवजी आम्हाला भेटत नव्हते. अजित पवारांकडून आमच्यावर अन्याय झाला. आमदार ओक्साबोक्सी रडत होते. राष्ट्रवादीला 57 टक्के काँग्रेसला 33 टक्के आणि शिवसेनेला 16 टक्के निधी मिळायचा. मुख्यमंत्री शिवसेनेचा,पण उद्धव ठाकरे काय कराचे? आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे खाते चालवत होते. आम्ही जेलमध्ये गेलो, तुम्ही काय भीक दिली का? शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मंत्रालययात किती वेळा गेलात? महाराष्ट्राशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहिलात, अशी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.