एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई: पालघरमध्ये कुपोषणाचा आणखी एक बळी गेला आहे. वाडा तालुक्यात रोशनी सवराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट मंत्री विष्णू सवरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तसेच सरकाराची असंवेदनशीलता पुन्हा दिसून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
'मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी'
'आमचे मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना कायमच क्लीन चीट देत असतात. पण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विष्णू सावरांना बडतर्फ न करता त्यांची हकालपट्टीच करावी. त्यांना बडतर्फ करणं कमीच आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळांना हाकलून दिलं पाहिजे.' अशी मागणी विखे-पाटील यांनी केली
'...म्हणून मंत्री सवरांना रोषाला सामोरं जावं लागलं'
माझ्याकडे जी आकडेवारी आहे. त्यानुसार वर्षभरात 600च्या वर मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. मतदारसंघात एवढी भीषण गोष्ट घडत असताना मंत्री सवरांना तिथे जाण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळेच त्यांना त्या मातेचा रोषाला सामोरं जावं लागलं.
'कुपोषणवाढीस हे सरकारच जबाबदार'
या सरकारनं जुन्या योजना स्वत:च्या प्रसिद्धीसाठी बंद करुन त्याच योजना नव्या नावानं सुरु केल्या आहेत. त्यामुळे कुपोषणवाढीस हे सरकारच जबाबदार आहे.
संतप्त मातेनं मंत्री विष्णू सवरांना दारातूनच हाकललं!
दरम्यान, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना एका आईनं आपल्या दारातून परत पाठवलं. 30 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सागर वाघ या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता.
मात्र, पालकमंत्री विष्णु सवरा यांना तब्बल 15 दिवसांनंतर पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. अखेर काल मंत्रीमहोदय पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले असता मयत मुलगा सागर वाघच्या आईनं विष्णु सवरा यांना दारातूनच परतावून लावलं.
पालघर जिल्ह्यात कुपोषणाचं थैमान सुरू आहे. जिल्ह्यात 7 हजार कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल 600 मुलांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. पालघर जिल्ह्यात सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कुपोषणाचे बळी जातच आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
भारत
Advertisement