एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश
![विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश Put Complain Box In School For Students Security Orders State Government Latest News Update विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/04130114/School_Mumbai.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
प्रत्येक आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याची सूचना राज्य सरकराने केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे तक्रारदार विद्यार्थ्यांचं नावं गुप्त ठेवलं जाणार आहे.
सरकारने शाळांना केलेल्या सूचना
- तक्रार पेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशद्वाराच्या जवळ आणि संबंधितांच्या नजरेस येईल, अशा ठिकाणी बसवावी
- तक्रार पेटी पुरेशा मापाची आणि सुरक्षित असावी.
- तक्रार पेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक/प्राचार्य, पोलिस प्रतिनिधी, पोलिस पाटील, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात यावी.
- गंभीर तसंच संवेदनशील स्वरुपाच्या तक्रारींसंदर्भात पोलिसाचं सहाय्य गरजेचं असल्यास ते तात्काळ घ्यावं.
- ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन/प्रशासन स्तरावर निकाली काढणं शक्य आहे, त्यावर शाळेने कारवाई करावी. गरज असेल तिथे सरकारी स्तरावर मदत घ्यावी.
- तक्रारदार विद्यार्थी/विद्यार्थिनीचं नाव गुप्त राहिल आणि त्याला/तिला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- संबंधित शाळेतील महिला शिक्षक तसंच विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवाव्यात. तर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)