एक्स्प्लोर

Pune Raj thackeray : मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान

Pune Raj thackeray :  मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते.

Pune Raj thackeray :  मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते. 'नवं काही' असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. पुण्याचं वाढतं स्वरुप आणि बदलत असलेली जीवनशैली यासंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी पुण्याबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, 1995 च्या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं पुणं आणि नदी अलीकडचं पुणं असे पुण्याचे केवळ दोन भाग होते. मात्र आता पुणं वाढत आहे. अनेक गाव पुण्यात समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे पुण्याचं रुपडं पालटलं. आता पुणं हिंजवडी, महाळुंगेपासून मगरपट्टापर्यंत पुणं पसरलं आहे. त्यामुळे मी मागील अनेक भाषणांमध्ये सांगत असतो कि मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं ते म्हणाले.

भाषण आणि व्याख्यानमालेतील फरक
आजपर्यंत अनेकदा मोठ्या ठिकाणी भाषणं केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत भाषेत बोलावं लागतं तर भाषणात टीका करावी लागते. आज व्याख्यान करणार आहे. त्यामुळे व्याख्यानात जसं बोललं जातं त्याप्रमाणे मी बोलणार आहे, असं ते म्हणाले.

गुजरात आणि बिहारचे लोक महाराष्ट्राबाहेर गेले तर मुंबईत काहीच उरणार नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. मात्र त्याच राज्यातील लोकांना कामधंद्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतं. त्यांना महाराष्ट्रानं मोठं केलं आहे, असंही म्हणत त्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमिताभ बच्चन जर त्यांच्या शहरातून मुंबईत आले नसते तर आज आपल्याला ते माहित नसते त्यांनादेखील महाराष्ट्रानं ओळख दिली आहे, असंही ते म्हणाले.

सध्याचं राजकारण बदलत आहे. विधानसभेतील कोणतेही भाषणं ऐकायची इच्छा होत नाही. यामुळे मुळ प्रश्न मागे पडतात आणि एकमेकांवर टीका केली जाते. आपल्यातील अनेकांनी मुळे प्रश्न विचारायचा हवेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावं. त्यांच्यामुळे महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही ते म्हणाले. अशा बदलत्या राजकारणामुळे तरुणाई दुरावली आहे त्यामुळे ही पीढी परदेशात जात आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी भारताला डंम्पिंग ग्राउंड बनवलं आहे, असंही ते म्हणाले. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget