एक्स्प्लोर
पुण्यातील बुधवार पेठेत तरुणीची प्रियकराकडून हत्या

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मंगळवारी रात्री 10.45 च्या सुमारास हा प्रकार घडला. बिनी मुल्ला (वय 22 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून ती मूळची पश्चिम बंगालची आहे. तिच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकर सुखदेव रामदास मडावीला (वय 27 वर्ष) अटक केली आहे. हत्या झालेली तरुणी बुधवार पेठेत राहायची. आरोपी सुखदेव नेहमी तिच्याकडे येत असे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























