एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

खाजगी 'शिवशाही'चा मनस्ताप, प्रवाशांना ताटकळत ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई नाही

ठेकेदाराची असल्यानं दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. त्यानुसार दुसरी खाजगी शिवशाही रवाना करण्यात आली. मात्र या दुसऱ्या बसमध्येही बॅटरीच्या खराबीमुळे बस बंद पडल्यानं प्रवाशी संतप्त झाले.

धुळे : धुळे-नाशिक या खाजगी शिवशाहीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोमवारी मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या घटनेला दोन दिवसाचा कालावधी उलटून देखील ठेकेदाराविरुद्ध कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे. एकीकडे एसटीच्या चालक, वाहकाकडून किरकोळ चूक झाली तरी त्याच्याकडून दुप्पट ते पाच पट दंड आकारला जातो . मग इथे ठेकेदाराला पायघड्या कशासाठी? असा सवाल प्रवाशी वर्गातून उपस्थित होत आहे. सोमवारी झालेल्या या प्रकाराबाबत एसटीचं मध्यवर्ती कार्यालय काय भूमिका घेतं याकडे आता प्रवाशांचं लक्ष लागून आहे. सोमवार , 9 सप्टेंबर रोजी या दिवशी धुळे बस स्थानकातून सकाळी साधारण साडेआठ वाजता नाशिक बायपाससाठी खाजगी शिवशाही प्रवाशांना घेऊन रवाना झाली. मात्र धुळे शहराजवळ असलेल्या अवधान टोल नाक्याजवळ या गाडीत वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड, तसेच स्पीडसंदर्भात बिघाड झाल्याने सदरची बस खोळंबली. ही गाडी ठेकेदाराची असल्यानं दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. त्यानुसार दुसरी खाजगी शिवशाही रवाना करण्यात आली. मात्र या दुसऱ्या बसमध्येही बॅटरीच्या खराबीमुळे बस बंद पडल्यानं प्रवाशी संतप्त झाले. यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी टोल नाक्याजवळ नाशिककडे जाणाऱ्या काही बसेस रोखून धरल्या.  प्रवाशांनी एसटीच्या मालकीच्या शिवशाही बसचीच मागणी केल्यानं अखेरीस एसटी महामंडळाच्या मालकीची शिवशाही रवाना करण्यात आली.  शिवशाहीचा मनस्ताप झालेल्या प्रवाशांनी परिवहन मंत्र्यांचा उद्धार करीत खाजगी शिवशाहीचा निषेध केला. एरवी एसटीच्या मालकीच्या बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होतात, मात्र त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाल्याचं तरी ऐकिवात नाही. धुळे बायपास नाशिक या मार्गावर एसटीच्या साध्या बसचं भाडं 205 रुपये आहे तर शिवशाहीचं भाडं 310 रुपये आहे. म्हणजे 105 रुपये भाडं ज्यादा देऊन आरामदायी , वातानुकूलित प्रवास व्हावा यासाठी शिवशाहीने प्रवास करतात मात्र प्रवाशांना ज्यादा पैसे मोजून सुद्धा मनस्ताप देणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.  तीन तासात होणारा हा प्रवास  खाजगी शिवशाहीच्या बिघाडामुळे पाच तासावर गेल्यानं ज्यादा पैसे देऊन मनस्ताप विकत घेतला असाच काहीसा अनुभव प्रवाशांना आला. तब्बल अडीच तास प्रवाशांना धुळे शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ताटकळत थांबावे लागले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget