एक्स्प्लोर

नाताळ, न्यू इअरच्या तोंडावर खासगी बसची भाडेवाढ

खासगी बसची भाडेवाढ, रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षा यांमुळे नाताळ आणि न्यू इअरट्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यां लोकांना मात्र यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मुंबई : शाळा महाविद्यालयांना नाताळची सुट्टी पडली असतानाच डिसेंबर महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस सुट्टी आली आहे. या सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या दरात 30 ते 50 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. नाताळची सुट्टी लागली की मुंबईकर गोवा, महाबळेश्वर, बैंगलोर, कोकण यांसारख्या ठिकाणांना पसंती देतात. पण सुट्ट्यांचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा भाव खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडून वाढवण्यात आले आहेत. ही भाडेवाढ सात जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. सातारा कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, सांगली येथे जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ातही 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर मुंबईतून राज्यातील अन्य मार्गावर जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खासगी बसची भाडेवाढ कशाप्रकारे आहे? मुंबई ते गोवा बिगरवातानुकूलित आसन : 1000-1200 रुपयांपर्यंत वातानुकूलित स्लीपर : 2000-3000 रुपयांपर्यंत मुंबई ते कणकवली बिगरवातानुकूलित आसन : 800-1000 रुपयांपर्यंत वातानुकूलित स्लीपर : 2000-2500 रुपयांपर्यंत मुंबई ते महाबळेश्वर बिगरवातानुकूलित आसन : 700-900 रुपयांपर्यंत वातानुकूलित स्लीपर : 1000-1500 रुपयांपर्यंत मुंबई ते नागपूर बिगरवातानुकूलित आसन : 1500-1800 रुपयांपर्यंत वातानुकूलित स्लीपर : 2700-2900 रुपयांपर्यंत मुंबई ते बेंगलोर बिगरवातानुकूलित आसन : 1600-1800 रुपयांपर्यंत वातानुकूलित स्लीपर : 2300-3000 रुपयांपर्यंत खासगी बसच्या भाड्यात केलेली वाढ ही शासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच करण्यात आली असल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे असे म्हणणे आहे. तसेच ऑफ सिझनचा लॉस भरून काढण्यासाठी सुट्टीच्या दिवसांत ही भाववाढ करण्यात आली आहे. या काळीत जादा गाड्या हायर कराव्या लागतात त्यामुळेच 7 जानेवारी पर्यंत ही भाववाढ असणार असून त्यानंतर दर पूर्वपदावर येतील. खासगी बसची भाडेवाढ, रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षा यांमुळे नाताळ आणि न्यू इअरट्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यां लोकांना मात्र यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget