एक्स्प्लोर

एसटी महामंडळाच्या जागेत होणार पोलिस वसाहती, विभाग नियंत्रकांना जागेची माहिती घेण्याच्या सूचना 

Maharashtra State Road Transport Corporation : एसटी महामंडळाच्या शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागांवर पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत. यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागांवर पोलिस वसाहती (Police colonies) बांधण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाने याबाबत राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महामंडळाकडून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र लिहण्यात आले आहे.  "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे, असे महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे. 

13 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांची याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत एसटी महामंडळाच्या रिक्त जागेत पोलिस वसाहती बांधण्याबाबत विचार झाला होता. मुख्य सचिवांनी त्यावेळी याबाबतचा आढावा घेतला होता. त्यानुसार आता एसटी महामंडळाच्या जागेत पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत.  

काय म्हटले आहे महामंडळाच्या पत्रात? 
"कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी कळविल्यानुसार 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. आपल्या विभागाच्या रिक्त जागेचा एस. टी. महामंडळाच्या प्रयोजनार्थ आणि भविष्यातील वाहतुकीची निकड लक्षात घेऊन राखीव ठेवण्यात याव्यात, तसेच उर्वरित रिक्त जागा पोलिस वसाहती बांधण्यासाठी उपलब्ध करून देता येईल किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी." असे राज्य परिवहन महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या जागेत जर पोलिस वसाहती उभारण्यात आल्या तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय सतत तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला देखील त्याचा फायदा होणार आहे. पोलिस वसाहती या शहाराच्या मध्यभागी असल्यास पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे. महामंडळाने त्यांच्या मध्यवर्ती भागातील जागांची माहिती घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. त्यामुळे जर महामंडळाच्या अशा मध्यवर्ती भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहती उपलब्ध झाल्या तर त्याचा पोलिसांना देखील चांगला फायदा होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

Nagpur News : एसटी भरतीत चालक-वाहकांकडून अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Embed widget