एक्स्प्लोर
कोकणसह, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
आज हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Maharashtra rain
1/10

राज्यात कुठं पाऊस तर कुठं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

आजही राज्यात मुसळधार पाऊस, पडण्याच अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
3/10

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
4/10

काही भागात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
5/10

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
6/10

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7/10

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8/10

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
9/10

ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
10/10

जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे.
Published at : 05 Jul 2024 05:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
