एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

Radhakrishna Vikhe Patil : दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले तालुक्यात सात दिवसांपासून शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरु होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित झाले.

अहमदनगर : दुधाला (Milk) 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले (Akole) तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे (Shubham Ambare) आणि संदिप दराडे (Sandip Darade) या शेतकरी पुत्रांचे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण (Hunger Strike) सुरु होते. आज दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. दुधाला हमीभाव देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. 

या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दुधाच्या व्यवसायात अनिश्चितता आहे. जागतिक बाजार पेठेत भुकटीचे भाव पडल्याने निर्यात बंद आहे. मागणीपेक्षा दुधाचे उत्पादन जास्त आहे. अनेक कारणांनी दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अनुदानासह 35 रुपये भावाचा निर्णय घेतला आहे. हमीभावासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दुधासाठी एमएसपी कायदा करण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तीन दिवसांपासून निलेश लंकेंचे आंदोलन सुरु

तर,  कांदा (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh lanke) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शेतकरी जनआक्रोश आंदोलन तीन दिवसांपासून सुरु आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आंदोलनस्थळी यावं, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांची आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती. मात्र निलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. निलेश लंके यांच्या आंदोलनावर नगरचे पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

आवश्यकता वाटल्यास निलेश लंकेंशी चर्चा करण्याची माझी तयारी

निलेश लंके यांच्या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. निलेश लंके खासदार म्हणून आंदोलन करताय यात काही वावगं नाही. त्याला राजकीय रंग देण्याची माझी भूमिका नाही. आवश्यकता वाटल्यास निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता निलेश लंके यांच्या आंदोलनावर काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Rani Lanke : सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार, राणी लंकेंचा इशारा, पिठलं-भाकरी करत केला सरकारचा निषेध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget