PM Security Lapse : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी पंजाब सरकारची, चंद्रकांत पाटील यांचा पंजाब सरकारवर घणाघात
पंजाबमधील पंतप्रधान मोदींच्या रद्द झालेल्या रॅलीनंतर आता राजकारणही जोरात सुरु झालं आहे. पंजाब सरकारने हे जाणूनबुजून केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मुंबई : मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरुन भाजपने पंजाब सरकारवर घणाघात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी पंजाब सरकारची असून पंजाब सरकारने जाणूनबुजून केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान यांच्या सुरक्षेची पंजाब सरकारने काळजी घ्यायला हवी होती. देशाच्या पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळता हे योग्य नाही. पंतप्रधानांचा ताफा येणार हे माहिती असूनही त्याच रस्त्यावर निदर्शकांनाही पोहचू दिलं हे चूकीचं असून चौकशीत सर्व प्रकार समोर येईल.
केंद्र आणि राज्य यांचे सलोख्याचे संबंध असायला हवे
केंद्र आणि राज्य यांचे सलोख्याचे संबंध असायला हवे. विरोधकांना या देशात अराजकता माजवायची आहे. याची चौकशी लागेल ही जर पंजाब सरकारची चूक आहे हे समोर आले तर पंजाब सरकार मान्य करणार आहे का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी या वेळी उपस्थित केला आहे.
कोणाला तरी एकदा राज्याचा मुख्यमंत्री करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. दोन महिने राज्याच्या जनतेने मुख्यमंत्र्याचा चेहरा पाहिला नाही. सध्या त्यांची तब्येत ठीक नाही. राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची गरज आहे. त्यामुळे कोणाला तरी एकदा राज्याचा मुख्यमंत्री करा. मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा रेकॉर्ड मोडला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय भाजप निवडणुका होऊ देणार नाही
ओबीसी आरक्षणासाठी भाजप कोर्टाची लढाई लढत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि जर निवडणूक लागली तर आम्ही सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देऊ असे देखील पाटील या वेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंना आयती थाळी मिळाली
बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयती थाळी मिळाली आहे. पण माझे वडील साधे ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हते त्यामुळे तुम्हालाही तशी रेडिमेड थाळी मिळणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
PM Modi Punjab Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले