भारत बायोटेकच्या Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्यातील चाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ची शिफारस, बुस्टर डोससाठी होणार वापर
कोव्हॅक्सीन ( Coaxing ) आणि कोव्हिशील्ड (Covishield vaccine ) या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोसाठी BBV154 नेसल व्हॅक्सीनचा वापर होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनबाधितांची (Omicron) संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे कडक नियमावलीसह लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. आता केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) विषय तज्ञ समितीने भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (DCGOI) कडे भारतीय बायोटेकच्या (Bharat Biotech) नेसल व्हॅक्सीनच्या (Nasal Vaccine) तिसऱ्या टप्यातील क्लिनीक चाचणीला मंजूरी देण्याची शिफारस केली आहे. कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्यासाठी या लसीचा वापर होणार आहे.
कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोसाठी BBV154 नेसल व्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्यातील क्लिनीक चाचणीला परवानगी देण्यासाठीचा प्रस्ताव भारत बायोटेकने दिला आहे. या प्रस्तावाला CDSCO च्या विषय तज्ञ समितीने DCGI च्या या चाचणीला परवानगी दिली आहे. आता या चाचणीला DCGOI ची मंजूरी बाकी आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना भारत बायोटेकने नेसल व्हॅक्सीनचा बुस्टर डोस देण्यासाची परवानगी मागितली होती. नेसल व्हॅक्सीन हे नाकातून दिले जाणारे औषध आहे. ही लस इंजेक्शनऐवजी नाकातून दिली जाईल. भारत बायोटकेने या व्हॅक्सीनच्या दुसऱ्या टप्यातील चाचणीचा डेटा CDSCO ला दिला होता. त्यानुसार ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. याच माहितीच्या आधारे विषय तज्ञ समितीने डीसीजीआयकडे या लसीच्या चाचणीला परवानगी देण्याची शिफारस केली होती.
भारतात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. बुस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोनाची लागण झाली तरी त्याची लक्षणे सौम्य असतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारत बायोटेकच्या नेसल व्हॅक्सीनची तिसऱ्या टप्यातील चाचणी यशस्वी झाली तर दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस म्हणून ही लस देण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या