PM Modi Punjab Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले
PM Modi Ferozepur Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द करण्यात आली असून पंतप्रधान दिल्लीकडे परतले आहेत.
PM Modi Ferozepur Rally : पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.
पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "अनेक कारणांमुळे आजच्या दौऱ्यात पंतप्रधान आमच्यात नसणार आहेत, मात्र आम्ही हा कार्यक्रम रद्द न करता, पुढे ढकलत नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे."
गृह मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bulli Bai App Case : बुली बाई अॅप प्रकरणात तिसरी अटक; 18 वर्षांची तरुणी मास्टर माईंड, पोलिसांकडून कसून तपास
- Coronavirus Maharashtra : तूर्तास लॉकडाऊन नाही, क्वारंटाईनचा कालावधी बदलला, राजेश टोपेंच्या महत्त्वाच्या 5 घोषणा
- Coronavirus India : होम आयसोलेशनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा