कोरोनाची रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढतेय, गावात येणाऱ्या लोकांना कॉरंटाईन केलं जाणार : हसन मुश्रीफ
खबरदारी म्हणून शहरातून गावात येणाऱ्या लोकांना कॉरंटाईन केलं जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला.
कोल्हापूर : कोरोनाची रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढत आहे. तरीही काळजी घेतली पाहिजे. विशेषत: लहान मुलांना जपले पाहिजे असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही ऑक्सीजन बेड आणि आसीयू बेड पुरेश्या प्रमाणात असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. खबरदारी म्हणून शहरातून गावात येणाऱ्या लोकांना कॉरंटाईन केलं जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्या दुसऱ्या लाटेत लोक शहरातून गावात येत होते. आता तशी परिस्थिती नाही. तरीही ग्राम समित्या सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात येणाऱ्या लोकांना कॉरंटाईन केलं जाणार असल्याचे मुश्रीफ यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना देखील टोल लगावला. कोरोनाच्या बाबत सर्व सुचना केंद्र सरकार पाठवत असते. मोदी साहेब ज्या सुचना देतात, त्याची आम्ही अमंलबजावणी करतो. चंद्रकांत पाटील यांना या निर्बंधाबाबत माहिती नसल्याचे मुश्रीफ यावेळी म्हणाले. केंद्राने दिलेल्या सुचना जर चुकीच्या आहेत असं दादांना म्हणायचे असेल तर तशी माहिती आम्ही केंद्राला देऊ असा टोला देखील मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 723 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 146 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात आतापर्यंत 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी 4 लाख 83 हजार 936 वर पोहोचली आहे. याबरोबरच 3 कोटी 45 लाख 172 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 4 हजार 33 ओमायक्रॉनच्या रूग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त रूग्ण राजस्थानमध्ये आढळले आहेत. राजस्थानध्ये आतापर्यंत 1 हजार 216 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. राजस्थान नंतर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत.
सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात काल तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. राज्यात काल 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: