एक्स्प्लोर

ST Strike : एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवारांनी थेट सांगितलं!

ST Strike : एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रथमच भाष्य केलं आहे. 

मुंबई : एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितली की ते शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे कोर्टातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीच्या बाबतची भूमिका आम्ही मान्य करु असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असं जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनी स्पष्ट केलं. एसटी संप आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आज खासदार शदर पवार, राज्याचे मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर शरद पवार बोलत होते. 

एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरद पवारांनी आज थेट भाष्य केलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही."

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली. 

शरद पवार म्हणाले की, "आनंद गोष्टीचा एका गोष्टीचा आहे, कृती समितीचे 20-22 प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना कामगारांच्या प्रश्नांचा जसा आग्रह आहे जो रास्त आहे, त्याप्रमाणे प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे, याही बाबतीत ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. माझं आवाहन आहे कर्मचाऱ्यांना आपली बांधीलकी प्रवाशांशी आहे, जे आवाहन कृती समितीने कर्मचाऱ्यांना केलं आहे त्याचा गांभीर्याने विचार कर्मचाऱ्यांनी करावा."

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कामावर परत यावं. कामावर परत आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. 

संबंधित बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2026 | मंगळवार 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2026 | मंगळवार 
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Embed widget