एक्स्प्लोर
पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळला
पालघर पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे. मात्र पालघरमध्ये शिवसेना निवडणूक लढवणारच आहे.
पालघर: पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपनं दिलेला प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला आहे. या निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.
वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्यांचं आम्ही पुनर्वसन करु. श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिला होता.
पालघर पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे. मात्र पालघरमध्ये शिवसेना निवडणूक लढवणारच आहे.
दरम्यान, पालघरमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी किती जण मागे घेतात, यावर या निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांचा अर्ज दाखल
दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करत, शिवसेनेकडून श्रीनिवासन वनगा यांचा अर्ज मंगळवारी 8 मे रोजी दाखल करण्यात आला. यावेळी ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.
‘एक मत शिवसेनेला, एक मत चिंतामण वनगा साहेबांना’, अशी मोहिम शिवसेनेने पालघरमध्ये सुरु केली आहे.
काँग्रेसचे राजेंद्र गावित भाजपमध्ये
दुसरीकडे, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालघरची उमेदवारी देण्यासाठी राजेंद्र गावित यांचं नाव भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवलं होतं. त्यांना अखेर भाजपने उमेदवारी दिली.
भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला.
कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
शेवटच्या दिवशीही भाजपची शिवसेनेला विनवणी, पालघरमध्ये नवा प्रस्ताव!
काँग्रेस नेते राजेंद्र गावित भाजपात, पालघरची उमेदवारी मिळणार
पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement