एक्स्प्लोर
Advertisement
राज्यात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना पाचशे रुपयाचा दंड
राज्यात आता कोणत्याही व्यक्तीलाही उघड्यावर शौच करताना पकडलं, तर त्याला पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबतचा उल्लेख केला आहे.
मुंबई : राज्यात आता कोणत्याही व्यक्तीलाही उघड्यावर शौच करताना पकडलं, तर त्याला पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबतचा उल्लेख केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थूंकणे, लघुशंका करणे आदींवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सरकारने कचरा व्यवस्थापन कायदा 2016 ची महापालिका आणि नगर परिषद परिक्षेत्रात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारावाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कचरा फेकून परिसर अस्वच्छ करत असेल, तर दोषी व्यक्तींकडून 150 ते 180 रुपये दंड वसूल केला जाईल. तर सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्या व्यक्तींकडूनही 100 ते 150 रुपये दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्याकडून 100 ते 200 रुपयापर्यंतचा दंड वसूल केला जाईल. विशेष म्हणजे, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून 500 दंड वसूल करण्याचे आदेशही यामार्फत देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement