एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाणार प्रकल्पासाठी सरकार एक पाऊल पुढे, आणखी एका कंपनीशी करार
रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार प्रकल्पासंदर्भात सरकार आणखी एक पाऊल पुढे गेलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत दुबईत आणखी एक महत्त्वाचा करार करण्यात येणार आहे. अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीही या महाकाय प्रकल्पात भागीदारी करणार आहे.
नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार प्रकल्पासंदर्भात सरकार आणखी एक पाऊल पुढे गेलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत दुबईत आणखी एक महत्त्वाचा करार करण्यात येणार आहे. अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीही या महाकाय प्रकल्पात भागीदारी करणार आहे.
सौदी अराम्कोनं करारावेळी आपला वाटा नंतर एका स्ट्रॅटेजिक पार्टनरसोबत शेअर करण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यानुसार आता अराम्को आणि adnoc म्हणजेच अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनी यांच्यात हा प्राथमिक करार होत आहे.
आज रविवारीच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पावरून पुन्हा आता वादंग होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा विरोध
नाणार प्रकल्प कोकणात काही होत नाही, आम्ही तो घालवला आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. तसंच, नाणार प्रकल्पाची विदर्भाला खरी गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
नाणारसारख्या प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत आणि विदर्भाला त्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, विदर्भात केवळ पोकळ अधिवेशन घेऊन काही होणार नसून, काही चांगले निर्णयही मुंबईत बसून घेतले जाऊ शकतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रीडा
क्राईम
Advertisement