Omicron Variant : राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी चार रुग्णांची नोंद, उस्मानाबादमध्ये दोन तर बुलढाणा, मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण
Omicron Case in Maharashtra : राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी चार रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी चार रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण
उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि लोकांची धाकधूक वाढल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शारजाह, युएई (संयुक्त अरब अमिरात) येथून उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी गावचा रहिवाशी 42 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 4 व्यक्तीचे आरोग्य विभागाने एकूण 5 नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविले होते. त्या पाचपैकी 43 वर्षीय पुरुष आणि त्याचा 16 वर्षीय मुलाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बुलढाण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव
दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या 65 वर्षीय व्यक्तीची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी एकूण 14 दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आहेत. मागील 9 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हा इसम कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. तो ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला आहे.
राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या 32 ओमायक्रॉन बाधितांपैकी 25 रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात 53 कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबई लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
- Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
- Omicron : ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने फैलावणारा व्हेरियंट, WHO ने दिला इशारा