Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान, केंद्राने आतापर्यंत कोणकोणत्या लसींची किती खरेदी केली? याचे तपशील प्रतिज्ञालेखात सादर करायला सांगितलं आहे. हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामध्ये आजवर लसीच्या खरेदीसाठी काढलेले विक्री आदेश आणि कोणत्या लसींची किती खरेदी केली याचे तपशील देण्यासाठी सुचवलं आहे. हे दस्तावेज कोर्टात सादर करताना, त्यावर वेगवेगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेली मते, मारलेले शेरे याचाही तपशील देणं बंधनकारक आहे. त्यासोबतच आतापर्यंत कोणकोणत्या वयोगटातील कुणाला किती लसी मिळाल्या आहेत, याचाही तपशील देण्याचे निर्देश जारी केले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 जून रोजी होणार आहे. केंद्रासोबत वेगवेगळ्या राज्य सरकारांनाही त्यांचं लसीकरणाचं धोरण आणि अन्य तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.























