एक्स्प्लोर
Advertisement
आजीबाईंच्या भाकरीच्या कपड्यात 45 हजार रुपयांच्या नोटा
पंढरपूर: 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागातील बँकांमध्ये नोटा बदलीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. पंढरपूरमधील माढा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतमजूर महिलेने भाकरी बांधायच्या कपड्यात 45 हजारांच्या नोटा बँकेत बदलायला घेऊन आल्याने, अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशभर नोट बदलीचे धुमशान सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर, गेल्या चार दिवसांपासून बँकांना अक्षरश: जत्रेचे स्वरुप आले आहे.
माढा शहरातील बँकामध्ये तर सकाळी 8 वाजल्यापासून गर्दी होत आहे. अशातच गडबडीच्या वेळेस शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चिंचोली गावाच्या एका 55 वर्षी भामाबाई महादेव देवकुळे या आजीबाईने आपल्या भाकरीच्या फडक्यातून 45 हजार रुपयांच्या 500 च्या नोटा जमा करण्यासाठी आणल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
वास्तविक, मोलमजुरी करणाऱ्या भामाबाई यांनी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपल्या वृद्धापकाळासाठी नोटा जमवून ठेवल्या होत्या. मात्र पंतप्रधानांच्या नोटबंदीची माहिती समजताच आपल्या भाकरीच्या फडक्यात भाकरीसोबत सगळ्या 500 आणि 100च्या नोटा कॅशियरकडे जमा केल्या. बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोटा मोजून त्यांच्या खात्यावर जमा केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement