एक्स्प्लोर
धुळ्याच्या मोर्चात 105 वर्षांचे आजोबा, आणि 95 वर्षांच्या आजी सहभागी

धुळे: धुळ्यातील मराठा मोर्च्यात सर्वात वयोवृद्ध दाम्पत्यांनी सहभागी होऊन कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवाला. या वयोवृद्ध दाम्पत्यांपैकी नारायण तोताराम पाटील यांचे वय 105 वर्षे आहे, तर त्यांची पत्नी सोजाबाई यांचे वय 95 वर्षे आहे. हे दोघेही शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावमधील रहिवासी आहेत.
दरम्यान, या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मराठा समाजातील बांधव धुळे शहरात दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा सुरुवात झाली.
या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेदेखील सहकुटुंब सहभागी झाले.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पर्सनल फायनान्स
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement


















