एक्स्प्लोर
पुण्यात रिक्षाचालक आक्रमक, ओला कॅबची तोडफोड

पुणे : ओला-उबरविरोधात रिक्षाचालकांचं मुंबईत शांततेत आंदोलन सुरु असताना पुण्यातील आंदोलनाला काहीस गालबोट लागलं आहे. पुणे आरटीओसमोर रिक्षाचालकांच्या आंदोलनादरम्यान ओलाच्या 2-3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. आरटीओसमोर सुमारे 400 ते 450 रिक्षाचालकांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या रिक्षाचालकांनी सिग्नलजवळ उभ्या असलेल्या ओला-उबर कॅबची तोडफोड केली. रिक्षाचालकांनी ओला-उबर गाड्यांच्या काचेचा अक्षरशः चक्काचूर केला आहे.
मुंबईतील 1 लाख 4 हजार रिक्षाचालकांचा आज संप
ओला, उबरसारख्या खाजगी कॅब सेवांवर कडक निर्बंध घालून त्यांच्यावर ताबडतोब बंदी घालावी आणि इतरही खाजगी अनधिकृत कॅब सेवांवर कारवाई करा, अशी प्रमुख मागणी या रिक्षाचालकांची आहे. रिक्षाचालकांच्या या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी अद्यापही कोणावरही कारवाई झालेली नाही.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























