एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुशोभीकरणाच्या नावाखाली अडथळा; राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने
मुंबई महानगरपालिकेने पालिका आणि सीएसटी चौकात सुशोभीकरण करताना रस्त्यांच्या कोपऱ्यांमध्ये पिवळे पट्टे मारुन त्या ठिकाणी काही कुंड्या, तर काही बाकडी ठेवलेली आहेत. त्यामुळं वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार करत राष्ट्रवादीने आंदोलन केलं.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच्या चौकात पालिकेच्या वतीने चारही बाजूला रस्ता अरुंद करुन त्याच रस्त्याच्या कॉर्नरला पिवळे पट्टे मारण्यात आलेले आहेत. या पिवळ्या पट्ट्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिके विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तर याविरोधात सह्यांची मोहीमही राबविण्यात आली.
शहर आणि रस्ता सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेने महापालिका आणि सीएसटी चौकात असणाऱ्या रस्त्यांच्या कोपऱ्यांमध्ये पिवळे पट्टे मारुन त्या ठिकाणी काही कुंड्या, तर काही बाकडी ठेवलेली आहेत. मुळातच या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. चारही बाजूला सिग्नल्स आहेत. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी हा मार्ग कमी पडतो. अशातच हा रस्ता पिवळे पट्टे मारुन अरुंद केल्यामुळे इतर दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच परिसरात दोन मोठी रुग्णालय आहेत. या परिसरात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या गर्दीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या परिसरातलं हे सुशोभीकरण त्वरित थांबवावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या सुशोभिकरणाच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली, तर सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेला या परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली वर्दळीचा रस्ता अरुंद करणाऱ्या महापालिकेने आपली भूमिका बदलली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते आणि त्यातच हा रस्ता लहान केल्यामुळे इथं भविष्यात मोठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याच परिसरात दोन मोठी रुग्णालय आहेत. त्यांच्या रुग्णवाहिकांनाही जायला जागा मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने याचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी प्रतिक्रिया सचिन पाटील यांनी दिली.
तर, महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्ता अरुंद करुन महापालिकेने काय मिळवले. ज्या ठिकाणी चार लेनचा रस्ता आहे, त्याठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली दोन लेन केले आहेत. रस्त्याला लागून पिवळे पट्टे मारुन त्याठिकाणी बाकडी ठेवलेली आहेत. याठिकाणी नागरिकांची बसण्याची वर्दळ वाढली आणि दुर्दैवाने एखादं वाहन येऊन धडकले तर मोठा अपघात होऊ शकतो. याचा विचार महापालिकेने करायला हवा, असे आदिल शेख म्हणाले.
संबंधित बातम्या :
बीएमसीच्या ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे, 735 कोटींचा गैरव्यवहार उघड
'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' योजनेतले पैसे अधिकाऱ्यांच्या खिशातून जाणार : बीएमसी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement