एक्स्प्लोर

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या भोसकून खून

सांगली मधील कुपवाडा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या भोसकून खून झालाय. घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत.

सांगली : जिल्ह्यातील कुपवाड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या खून झालाय. दत्तात्रय महादेव पाटोळे, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिवसाढवळ्या पाठलाग करून तिघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून खून केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मिरज औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अशोकासमोरील रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये पाटोळे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला.

प्राथमिक तपासात पाटोळे यांचा खून आर्थिक वादातून झाला असावा अशी शक्‍यता पोलिसानी व्यक्त केली आहे. तिघा हल्लेखोरांनी खून करून पलायन केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना तातडीने तपासाबाबत सूचना दिल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून खून झाला असावा, अशी शक्‍यता आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यात पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ गाव बंद

पाठलाग करुन निघृण खून दत्तात्रय पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय पदाधिकारी आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचे त्यांच्याकडे कंत्राट होते. दुपारी 12 च्या सुमारास ते दुचाकीवरून मिरज औद्योगिक वसाहतीकडे जात असताना हॉटेल अशोकासमोर आले असता तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले. हॉटेल अशोकासमोरच असलेल्या रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये त्यांनी धाव घेतली. तेव्हा हल्लेखोरानी आतमध्ये घुसून पाटोळे यांना गाठत धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्‍यावर आणि इतरत्र वार केले. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या भोसकून खून

घटनेनंतर हल्लेखोर पसार निर्घृणपणे वार झाल्यामुळे काही क्षणातच पाटोळे मृत झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तत्काळ धावले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे आणि पथक घटनास्थळी होते. परिसरात नागरिकांची गर्दी जमली. गर्दी हटवून पंचनामा करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्याचे समजताच शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

NCP Leader Dattatray Patole Murder | सांगलीत कुपवाडमध्ये राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षाची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Embed widget