एक्स्प्लोर

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांना हरित लवादाचा दणका

सोलापूर : नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या माफियांना आणि त्यांना अभय देणाऱ्या प्रशासनाला राष्ट्रीय हरित लवादाने चांगलाच दणका दिला आहे. नदी पात्रातून यांत्रिक बोटीनं वाळू उपसा करण्यावर हरित लवादानं बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या केंद्रीय समितीने भीमा नदी पात्रात जाऊन केलेल्या पाहणीच्या आधारे हा निकाल दिला आहे. कर्नाटकातील माजी आमदाराने केलेल्या जनहित याचिकेची  हरित लवादाने  दखल घेतल्याने माफियांचे आणि महसूल विभागाचे धाबे दणाणलेत. यांत्रिक बीटीतील तेलाच्या तवंगाने मानवी आरोग्य धोक्यात आल्याच प्राथमिक तपासणीत आढळून आल होत. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय हरित लवादाच्या कोर्ट कमिशनने सोलापूरातल्या नदीची पाहणी केली होती. भीमा नदीच्या पात्रात दाखल झालेया या पथकानं बेकायदा वाळू उपशाच परिक्षण केल होतं. अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला सुपूर्द राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या कोर्ट कमिशनने बेकायदा वाळू उपसामुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि मानवी आरोग्यावरचे दुष्परिणाम याची सुद्धा पाहणी केली होती. हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली कार्यालयाला सुपूर्द करण्यात आला होता. वाळूमाफियांविरोधात कर्नाटकातील माजी आमदाराची याचिका कर्नाटकातील माजी आमदाराच्या याचिकेवरून दिल्लीची ही समिती सोलापूरच्या भीमा नदी काठावर पाहणीसाठी आली होती. यांत्रिक बोटींच्या वापराला महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही वाळू ठेक्यांचे लिलाव झालेल्या ठिकाणी सर्रासपणे यांत्रिक बोटी वापरल्या जातात. यातून मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या उत्पन्नामुळे वाळू माफिया गब्बर झाले आहेत. त्यामुळे याचिका दाखल करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्लेही वाळूमाफियांनी केले आहेत. वाळू उपसा बंद करण्याची पालिका आयुक्तांची मागणी सोलापूर शहरासाठी उजनीतून सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यात साठवल जात. औज आणि चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्याच्या ठिकाणी वाळू उपसा होतो. यांत्रिक बोटीतून निघणारे तेलाचे तवंग पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होतय. याचा मानवी आरोग्यावरील संभाव्य धोका ओळखून खुद्द पालिका आयुक्तांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली होती. बेकायदा वाळू उपशाने शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडतो आणि नदी प्रदूषित होते एवढंच बोललं जात होतं. स्थानिक पातळीवरून कारवाई करण्यात प्रशासन अनास्था दाखवत असल्याने हरित लवादानेच आता पुढाकार घेतला आहे. कोर्ट कमिशनने दाखल केलेल्या अहवालावरून हरित लवादने यांत्रिक बोटीने उपसा करण्यास बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget