एक्स्प्लोर
नांदेड पोलिस भरती घोटाळ्यात 15 आरोपींना बेड्या
नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अद्यापही फरार आहेत.
नांदेड : नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अद्यापही फरार आहेत.
या सर्व फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात नांदेड पोलिस अधीक्षकांचं अभिनंदन केलं आहे.
नांदेड पोलिसांनी या घोटाळ्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे पाठवला आहे. वरवर लहान वाटणार्या या घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत असून सर्व आरोपींनी एकूण 17 जिल्ह्यात असेच प्रकार केल्याचे तपासात समोर येत आहे.
घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलिस तपासात उघड झाली.
प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.
डॉ. विजय भटकरांचं स्पष्टीकरण
"नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करा," अशी मागणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली. तसंच पोलिस भरती घोटाळ्याशी आणि प्रवीण भटकरशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा
नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. दोन पोलिस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.
पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.
संबंधित बातम्या :
SRPF भरतीसाठी उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये उकळले
प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा : विजय भटकर
नांदेड पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या?
साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडमध्ये घोटाळा उघड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement