एक्स्प्लोर
5 लिटरमागे 400 मिली पेट्रोल कमी, नागपुरात कारवाई

नागपूर : मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपांमध्ये ठाणे क्राईम ब्रांचने महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी पकडली आहे. नागपूरच्या जरीपटका परिसरातल्या श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंपावर पोलिसांनी धाड टाकली. छापेमारीत पंपावरील पेट्रोल व्हेंडिंग मशिन्समधली गडबड ठाणे क्राईम ब्रांचने उघडकीस आणली. धाड पडलेल्या या पंपावर प्रत्येक पाच लिटर पेट्रोलमागे ग्राहकांना तब्बल 400 मिलीलिटर पेट्रोल कमी दिलं जात असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मायक्रोचिपच्या आधारे ही पेट्रोल चोरी होत असल्यामुळे पेट्रोल घेणाऱ्या ग्राहकांच्या लक्षात येत नव्हती आणि त्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड या पेट्रोल चोरीमुळे बसत होता. पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं गेल्या महिन्यात पर्दाफाश केला होता. ही टोळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये छेडछाड करायची. पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचं. त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांतल्या पेट्रोलपंपामध्ये हेराफेरी केल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी या सर्व शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर छापेमारीचं सत्र सुरु केलं ह
संबंधित बातम्या
कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा इशारा
चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील
पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























